शिंदेंच्या शिवसेनेच्या दुसऱ्या यादीत आयारामांना संधी, वरळीत आदित्य ठाकरेंविरुद्ध मिलिंद देवरा; भावना गवळींना उमेदवारी देऊन पुन्हा गेम?


मुंबईः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. २० उमेदवारांच्या या यादीत काही आयारामांना उमेदवारी दिली आहे. निलेश राणे, संतोष शेट्टी, मुरजी पटेल हे काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत आले होते. त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे (उबाठा) विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने माजी खासदार, माजी मंत्री मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे माजी खासदार भावना गवळी यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या गटात आलेले निलेश राणे यांना कुडाळमधून, संतोष शेट्टी यांना भिंवडी पूर्वमधून तर मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्वमधून उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीत या तिन्ही जागा शिंदेंना सुटल्यामुळे हे नेते शिवसेनेत आले होते.

लोकसभा निवडणुकीत तिकिट कापण्यात आलेल्या भावना गवळी यांना रिसोडमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. भावना गवळी या या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशा पाच टर्म खासदार राहिल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे तिकिट कापण्यात आले होते. त्यानंतर त्यांना  विधान परिषदेवर आमदार म्हणून घेण्यात आले होते. विधान परिषदेची सहा वर्षांची टर्म संपण्याआधीच त्यांना आता रिसोडमधून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे भावना गवळींना पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवून त्यांचा ‘राजकीय गेम’ केला जात आहे की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे २० उमेदवार

  • अक्कलकुवाः आमश्या पाडवी
  • बाळापूरः बळीराम शिरसकर
  • रिसोडः भावना गवळी
  • हदगावः बाबुराव कोहळीकर
  • नांदेड दक्षिणः आनंद तिडके पाटील
  • परभणीः आनंद भरोसे
  • पालघरः राजेंद्र गावीत
  • बोईसरः विलास तरे
  • भिवंडी ग्रामीणः शांताराम मोरे
  • भिवंडी पूर्वः संतोष शेट्टी
  • कल्याण पश्चिमः विश्वनाथ भोईर
  • अंबरनाथः बालाजी किणीकर
  • विक्रोळीः सुवर्णा कारंजे
  • दिंडोशीः संजय निरूपम
  • अंधेरी पूर्वः मुरजी पटेल
  • चेंबूरः तुकाराम काते
  • वरळीः मिलिंद देवरा
  • पुरंदरः विजय शिवतारे
  • कुडाळः निलेश राणे
  • कोल्हापूरः राजेश क्षीरसागर

काँग्रेसचे १४ उमेदवार असे

काँग्रेसने आज १४ उमेदवारांची सुधारित यादी जाहीर केली आहे. या यादीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आधी एम. के. देशमुखांना उमेदवारी देण्यात आली होती. ती बदलण्यात आली असून त्यांच्याऐवजी लहु शेवाळेंना उमेदवारी देण्यात आली आहे. अंधेरी पश्चिममध्येही सचिन सांवत यांच्याऐवजी अशोक जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • अळमनेरः डॉ. अनिल शिंदे
  • उमरेडः संजय मेश्राम
  • आरमोरीः रामदास मेश्राम
  • चंद्रपूरः प्रवीण पाडवेकर
  • बल्लारपूरः संतोषसिंग रावत
  • वरोराः प्रवीण काकडे
  • नांदेड उत्तरः अब्दुल सत्तार अब्दुल गफूर
  • औरंगाबाद पूर्वः लहू एच. शेवाळे (एम. के. देशमुख यांच्याऐवजी)
  • नालासोपाराः संदीप पांडे
  • अंधेरी पश्चिमः अशोक जाधव (सचिन सांवत यांच्याऐवजी)
  • शिवाजीनगरः दत्तात्रय बहिरट
  • पुणे कॅन्टोनमेंटः रमेश बागवे
  • सोलापूर दक्षिणः दिलीप माने
  • पंढरपूरः भगीरथ भालके

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चार उमेदवार

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आज चार उमेदवार जाहीर केले. फलटणचे दिलीप सचिन पाटील यांनी आजच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना लगेच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

  • गेवराईः विजयसिंह पंडित
  • फलटणः सचिन पाटील
  • निफाडः दिलीपकाका बनकर
  • पारनेरः काशीनाथ दाते

वंचित बहुजन आघाडीचे ४४ उमेदवार

वंचित बहुजन आघाडीनेही आज ४४ उमेदवारांची यादी जाहीर केली. औरंगाबाद पूर्व आणि बुलढाण्यातील उमेदवार वंचितनेही बदला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले अफसर खान यांना औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

  • बुलढाणाः प्रशांत वाघोदे (सदानंद माळी यांच्याऐवजी)
  • औरंगाबाद पूर्वः अफसर खान यासीन खान (विकास दांडगे यांच्याऐवजी)
  • गंगापूरः अनिल चंडालिया (सय्यद गुलाम नबी सय्यद यांच्याऐवजी)
  • जळगाव ग्रामीणः प्रवीण जगन्नाथ सपकाळे
  • अमळनेरः विवेकानंद वसंतराव पाटील
  • एरंडोलः गौतम मधुकर पवार
  • बुलढाणाः प्रशांत उत्तम वाघोदे
  • जळगाव जामोदः डॉ प्रवीण पाटील
  • अकोटः दीपक बोडके
  • अमरावतीः राहुल मेश्राम
  • तिरोराः अतुल मुरलीधर गजभिये
  • राळेगावः किरण जयपाल कुमरे
  • उमरखेडः तात्याराव मारोतराव हनुमंते
  • हिंगोलीः जावेद बाबु सय्यद
  • फुलंब्रीः महेश कल्याणराव निनाळे
  • वैजापूरः किशोर भीमराव जेजुरकर
  • नांदगावः आनंद सुरेश शिनगारे
  • भिवंडी ग्रामीणः प्रदिप दयानंद हरणे
  • अंबरनाथः सुधीर पितांबर बागुल
  • कल्याण पूर्वः विशाल विष्णु पाव
  • डोंबिवलीः सोनिया इंगोले
  • कल्याण ग्रामीणः विकास इंगळे
  • बेलापूरः सुनील प्रभू भोले
  •  मागाठाणेः दिपक हनवते
  • मुलुंडः प्रदीप महादेव शिरसाठ
  • भांडूप पश्चिमः स्नेहल सोहनी
  • चारकोपः दिलीप लिंगायत
  • विलेपार्लेः संतोष गणपत अमुलगे
  • चांदिवलीः दत्ता निकम
  • कुर्लाः स्वप्नील जवळगेकर
  • श्रीरामपूरः अण्णासाहेब आप्पाजी मोहन
  •  निलंगाः मंजू निंबाळकर
  • माढाः मोहन नागनाथ हळणवर
  • मोहळः अतुल मुकुंद वाघमारे
  • बांद्रा पश्चिमः आकीफ दाफेदार
  • माहीमः आरिफ उस्मान मिठाईवाला
  • भायखळाः फहाद मुजाहिद खान
  • कोथरूडः योगेश दीपक राजापुरकर
  • खडकवासलाः संजय जयराम धिवर
  • साताराः बबन गणपती करडे
  • चंदगडः अर्जुन मारुती दुंडगेकर
  • करवीरः दयानंद मारुती कांबळे
  • इचलकरंजीः शमशुद्दिन हिदायतुल्ला मोमीन
  • तासगाव कवठे महाकाळः युवराज चंद्रकांत घागरे

मनसेचीही ३२ उमेदवारांची यादी जाहीर

राज ठाकरे यांच्या मनसेनेही आज ३२ उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. ती यादी अशीः

  • नंदूरबारः वासुदेव गांगुर्डे
  • मुक्ताईनगरः अनिल गंगतिरे
  • आर्वीः विजय वाघमारे
  • सावनेरः घनश्याम निखाडे
  • नागपूर पूर्वः अजय मारोडे
  • कामठीः गणेश मुदलियार
  • अर्जुनी-मोरगावः भावेश कुंभारे
  • अहेरीः संदीप कोरेत
  • राळेगावः अशोक मेश्राम
  • भोकरः साईप्रसाद जटालवार
  • नांदेड उत्तरः सदाशिव आरसुळे
  • परभणीः श्रीनिवास लाहोटी
  • कल्याण पश्चिमः उल्हास भोईर
  • उल्हास नगरः भगवान भालेराव
  • आंबेगावः सुनील इंदोरे
  • संगमनेरः योगेश सूर्यवंशी
  • राहुरीः ज्ञानेश्वर गाडे (माऊली)
  • अहमदनगर नगर शहरः सचिन डफळ
  • माजलगावः श्रीराम बादाडे
  • दापोलीः संतोष अबगुल
  • इचलकरंजीः रवी गोंदकर
  • भंडाराः अश्विनी लांडगे
  • अरमोरीः रामकृष्ण मडावी
  • कन्नडः लखन चव्हाण
  • अकोला पश्चिमः प्रशंसा मनोज अंबेरे
  • सिंदखेडाः रामकृष्ण पाटील
  • अकोटः कॅप्टन सुनील डोबाळे
  • विलेपार्लेः जुईली शेंडे
  • नाशिक पूर्वः प्रसाद दत्तात्रय सानप
  • देवळालीः मोहिनी गोकुळ जाधव
  • नाशिक मध्यः अंकुश अरुण पवार
  • जळगाव ग्रामीणः मुकुंदा आनंदा रोटे
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!