भाजपकडून ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोर नेत्यांवर कारवाईचा बडगा, शिस्तभंगामुळे पक्षातून हकालपट्टी


मुंबईः विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या तीनही घटक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पक्षाचा आदेश डावलून शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत ४० बंडखोर नेत्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपच्या कारवाईनंतर आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांच्या पक्षातील बंडखोरांवर कारवाई करणार का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

राज्याच्या अनेक मतदारसंघात भाजप नेत्यांनी ठिकठिकाणी बंडखोरी केली आहे. पक्षादेश डावलून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पक्षाच्या नेत्यांनी मनधरणी करूनही अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पक्षातून करण्यात येत होती. या बंडखोर नेत्यांवर कारवाई न झाल्यास महायुतीत चुकीचा संदेश जाईल आणि त्याचा विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर भाजपने बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ ऑक्टोबर ही शेवटची मुदत होती. त्या दिवसापर्यंत महायुतीमधील ५० नेत्यांनी बंडखोरी केली होती. त्यापैकी ३६ उमेदवार हे महायुतीचे होते. त्यात सर्वाधिक १९ उमेदवार भाजपचे आहेत तर १६ उमेदवार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच बंडखोर उमेदवार आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे ज्या नेत्यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली, त्यांची नावे अशीः

नांदेड दक्षिणः दिलीप कंदकुर्ते, सुनिल मोरे, संजय घोगरे, नांदेड उत्तरः वैशाली देशमुख, घनसावंगीः सतीश घाटगे, जालनाः अशोक पांगारकर, गंगापूरः सुरेश सोनवणे, वैजापूरः एकनाथ जाधव.

मालेगाब बाह्यः शिवाजी सूर्यवंशी, बागलानः आकाश साळुंखे, जयश्री गरूड, नालासोपाराः हरिष भगत, भिवंडी ग्रामीणः स्नेहा पाटील, कल्याण पश्चिमः वरूण पाटील, मागाठणेः गोपाळ जव्हेरी, जोगेश्वरी पूर्वः धमेंद्र ठाकूर.

अलिबागः दिलीप भोईर, नेवासाः बाळासाहेब मुरकुटे, सोलापूर शहर उत्तरः शोभा बनशेट्टी, अक्कलकोटः सुनिल बंडगर, श्रीगोंदाः सुवर्णा पाचपुते, सावंतवाडीः विशाल परब, धुळे ग्रामीणः श्रीकांत करर्ले,सोपान पाटील.

जळगाव शहरः मयुर कापसे, अश्वीन सोनवणे, अकोटः गजानन महाले, वाशिमः नागेश घोपे, बडनेराः तुषार भारतीय, अमरावतीः जगदीश गुप्ता, जगदीश गुप्ता, अचलपूरः प्रमोदसिंह गडरेल.

साकोलीः सोमदत्त करंजेकर, आमगावः शंकर मडावी, चंद्रपूरः ब्रिजभूषण पाझारे, ब्रह्मपुरीः वसंत वरजूरकर, वरोराः राजू गायकवाड, अतेशाम अली, उमरखेडः भाविक भगत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!