मुंबई: विधासभा निवडणुकीसाठी भाजपने आज २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत सुधीर मुनगंटिवारांचा विरोध डावलून किशोर जोरगेवार यांना चंद्रपूकमधून उमेदवारी देण्यात आली आहे तर तीन विद्यमान आमदारांचे पत्ते कट करण्यात आले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघा एक दिवस उरलेला असताना भाजपने आज तिसरी उमेदवार यादी जाहीर केली. भाजपने ९९ उमेदवारांची पहिली, २२ उमेदवारांची दुसरी आणि आज २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यामुळे महायुतीत भाजपने सर्वाधिक १४६ उमेदवार जाहीर केले आहेत.
तिसऱ्या यादीत भाजपने तीन विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहेत. आर्णीतून संदीप दुर्वे यांचे तिकिट कापून राजू तोडसाम यांना, नागपूर मध्यमधून विकास कुंभारे यांचे तिकिट कापून प्रवीण दटके यांना आणि आर्वीचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांचे तिकिट कापून सुमीत वानखेडे यांना तिकिट देण्यात आले आहे. तर आष्टीचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांच्या विरोधात भाजपने सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपच्या तिसऱ्या यादीतील उमेदवार असे
- मूर्तीजापूर: हरीश पिंपळे
- कारंजा: सई डहाके
- तिवसा: राजेश वानखेडे
- मोर्शी: उमेश यावलकर
- आर्वी: सुमित वानखेडे
- कटोल: चरणसिंग ठाकूर
- सावनेर: डॉ. आशीष देशमुख
- नागपूर मध्य: प्रवीण दटके
- नागपूर पश्चिम: सुधाकर कोहळे
- नागपूर: डॉ. मिलिंद माने
- साकोली: अविनाश ब्राह्मणकर
- चंद्रपूर: किशोर जोरगेवार
- आर्णी: राजू तोडसाम
- उमरखेड: किशन वानखेडे
- देगलूर: जितेश अंतापूरकर
- डहाणू: विनोद मेढा
- वसई: स्नेहा दुबे
- बोरिवली: संजय उपाध्याय
- वर्सोवा: डॉ. भारती लव्हेकर
- घाटकोपर पूर्व: पराग शहा
- आष्टी: सुरेश धस
- लातूर शहर: डॉ. अर्चना पाटील चाकूरकर
- माळशिरस: राम सातपुते
- कराड उत्तर: मनोज घोरपडे
- पलूस-कडेगाव: संग्राम देशमुख