आयपीएल-२०२५चे वेळापत्रक जाहीरः २२ मार्चपासून रंगणार १३ शहरांत ७४ सामन्यांचा थरार! वाचा तुमच्या आवडत्या संघाची कधी कुणाशी टक्कर?


मुंबईः इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या २२ मार्चपासून आयपीएलच्या या हंगामातील थरार रंगणार असून एकूण १० संघांमध्ये १३ शहरांत ७४ सामन्यांचा थरार क्रिकेटप्रेमींना पहायला मिळणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना २५ मे रोजी खेळवला जाणार आहे.

२२ मार्च रोजी गतविजेता केकेआर (कोलकाता नाईट रायडर्स) आणि आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) यांच्यातील सामन्याने आयपीएलचा १८ वा हंगाम सुरू होईल. हा सामना कोलकाता येथील इडन गार्डनवर खेळवला जाईल. स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी ईडन गार्डनवरच खेळवला जाईल. तब्बल ६५ दिवस चालणाऱ्या आयपीएल २०२५ चे ७४ सामने १३ शहरांत होतील.

२२ मार्च ते १८ मेदरम्यान लीग सामने होतील. त्यानंतर २० मे २५ मे दरम्यान प्लेऑफचे सामने होतील. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके), मुंबई इंडियन्स (एमआय), कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर), राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स हे १० संघ आयपीएलचे विजेतेपद पटकावण्यासाठी झुंज देतील.

विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे दोन संघ फक्त एकाच वेळी ७ एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमने-सामने येतील. दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग आणि आरसीबी हे संघ या स्पर्धेत दोनवेळा आमने-सामने येतील. त्यांच्यातील पहिला सामना २८ मार्च रोजी चेन्नईत तर दुसरा सामना ३ मे रोजी बेंगळुरूत होईल. सीएसकेची जुना प्रतिस्पर्धी मुंबई इंडियनशी २३ मार्च रोजी चेन्नईत आणि २० एप्रिल रोजी मुंबईत लढत होईल.

आयपीएल २०२५ मध्ये डबल हेडर सामने होणार आहेत. म्हणजेच दिवसा १२ वेळा दोन सामने खेळवले जातील. दुपारचे सामने ३.३० वाजता सुरू होतील तर सायंकाळचे सामने ७.३० वाजता सुरू होतील. पहिला डबल हेडर सामना २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये हैदराबादेत दुपारी ३.३० वाजता होईल. पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारे चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि मुंमबई इंडिन्स या दोन संघात चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता अटीतटीचा सामना होईल.

तुमच्या आवडत्या संघाची कधी कुणाशी टक्कर?

IPL 2025 Schedule

पहिला क्वालिफायर २० मे रोजी

आयपीएल २०२५ ची रचना आयपीएल २०२४ सारखीच आहे. या रचनेनुसार १० संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ लीग टप्प्यात १४ सामने खेळणार आहे. पॉइंट टेबलमधील अव्वल दोन संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये भीडतील तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघामध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत संघ आणि एलिमिनेटरमध्ये जिंकणारा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये भीडतील. येथे विजेता होणारा संघ पहिल्या क्वालिफायरमधील विजेत्या संघाविरुद्ध अंतिम फेरीत पोहोचेल.

आयपीएलचे प्लेऑफ सामने हैदराबाद आणि कोलकातामध्ये होतील. हैदराबादेत क्वालिफायर-१ चा सामना २० मे रोजी तर एलिमिनेटर सामना २१ मे रोजी खेळवला जाईल. क्वालिफायर-२ चा सामना २३ मे रोजी कोलकात्यात होईल. आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ७४ सामने लखनऊ, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गुवाहटी, बेंगळुरू, न्यू चंदीगड, जयपूर, दिल्ली, कोलकाता आणि धर्मशाळा येथे खेळवले जाणार आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!