मुंबई: सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयातील विद्यार्थीनींना शासकीय वसतिगृह वांद्रे येथे लवकरात लवकर स्थलांतरित करावे असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयातील विद्यार्थीनींना शासकीय वसतिगृह, वांद्रे येथे स्थलांतरित करण्याबाबत आढावा बैठक मंत्रालय मुंबई येथे घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ या अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर ,तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, ग्रंथालयाचे संचालक दत्तात्रेय क्षिरसागर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बन गोसावी व संबंधित अधिकारी उपस्थित होते
सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयातील विद्यार्थीनींना शासकीय वसतिगृह वांद्रे येथे स्थलांतरीत करणे संदर्भात तातडीने कार्यवाही करावी. वसतिगृह इमारत धोकादायक स्थितीत असल्याने इमारत तात्काळ रिक्त करणे आवश्यक आहे त्याचबरोबर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय तातडीने घेणे आवश्यक आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.