भाजपचे लोक मते मागायला आल्यास चप्पलेने माराः श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांचे वक्तव्य


बंगळुरूः भाजप नेते काहीच काम करत नाहीत. फक्त मोदींचे नाव घेतात. घरोघरी जाऊन मोदींचे नाव घेऊन मते मागणाऱ्या भाजप नेत्यांना चप्पलने मारा, असे कर्नाटकातील श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी म्हटले आहे.

कारवारमधील एका कार्यक्रमात बोलताना प्रमोद मुतालिक यांनी हे वक्तव्य केले आहे. मुतालिक हे कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. करकला विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

भाजपचे लोक नालायक आहेत. बेकार लोक मोदींचे नाव घेऊन मते मिळवतात. मात्र लोकांच्या समस्या त्यांना समजत नाहीत, असे मुतालिक म्हणाले.

कर्नाटकातील भाजप नेत्यांना मुतालिक यांनी आव्हान दिले आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी यावेळी मोदींच्या नावावर मते मागू नयेत. भाजपच्या बॅनरवर किंवा पत्रकावरही मोदींचा फोटो असू नये. मतदारांना तुम्ही जी विकासकामांची आश्वासने दिली होती, तिच विकासकामे केल्याचे जनतेला सांगा, असे मुतालिक म्हणाले.

 तुम्ही गायींना वाचवले आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी काम केले आहे. तुम्ही मोदींचा फोटो न वापरता मते मागण्याचा प्रयत्न करा, असे आव्हानच मुतालिक यांनी भाजप नेत्यांना दिले आहे.

 स्थानिक भाजप नेते विकासकामांच्या नावावर मते मागणार नाहीत. त्यामुळे ते जेव्हा तुमच्या घरी येतील तेव्हा जर त्यांनी मोदींना मत द्या असे ते म्हणतील. जर त्यांनी मोदींचे नाव घेतले त्यावेळी तुमिही त्यांना चप्पलने मारा, असे आवाहन मुतालिक यांनी मतदारांना केले आहे.

कर्नाटकातील करकला विधानसभा मतदारसंघातील हेबरी तालुक्यातील शिवपुरा गावातील कथित बेनामी जमीन व्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही मुतालिक यांनी लोकायुक्तांकडे केली आहे. निवडणुकीच्या रिंगणातून आपण माघार घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!