सीएचबीवरील प्राध्यापकांना खुश खबर! तासिका तत्वावरील मानधनात ‘एवढी’ मोठी वाढ!


मुंबई: तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

 राज्यातील शासकीय महाविद्यालये/ संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे रिक्त आहेत.  मात्र विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये यादृष्टीने रिक्त पदांवर तासिका तत्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

उच्च शिक्षण संचालनालय:

 कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता ६२५ रुपयावरुन १ हजार रुपये प्रतितास व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता ७५० रुपयांवरून १ हजार रुपये प्रतितास.

 शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण / विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता  ७५० रुपयांवरून १ हजार रुपये प्रतितास.

तंत्र शिक्षण संचालनालय:

 उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ /अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान १ हजार रुपयांवरून १हजार ५०० रुपये प्रतितास.

पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन दर ६०० रुपयांंवरून १ हजार रुपये प्रतितास.

पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन दर ५०० रुपयांवरून ८०० रुपये प्रति तास.

कला संचालनालय:

उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान मानधन दर ७५० रुपयांवरून १ हजार ५०० रुपये प्रतितास.

कला शिक्षण पदविका तसेच पदवी/पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन दर ६२५ रुपयांवरून १ हजार रुपये प्रतितासाप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *