पुणेः हापकिडो बॉक्सिंग राष्ट्रीय महासंघाच्या चेअरमनपदी डॉ. जगन्नाथ शिंदे यांची तर मुख्याधिकारी म्हणून रवींद्र चोथवे यांची निवड करण्यात आली. कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रभाकर ढगे यांची तर सरचिटणीसपदी अॅड. राज वागदकर यांची निवड करण्यात आली. सन २०२२ -२५ या कालावधीसाठी ही निवड असेल.
खंडाळा- पुणे येथे हापकिडो बॉक्सिंग राष्ट्रीय महासंघाच्या वार्षिक सर्वधारण सभेची बैठक नुकतीच पार पडली. त्यात मागील सभेचे इतिवृत्त वाचून त्यास मान्यता आणि नवीन प्रस्ताव सर्वानुमते संमत करून घेण्यात आले. या बैठकीचे संचालन ऍड. राज वागदकर, रवींद्र चोथवे व यू. नटराजन यांनी केले. ऍड. प्रतीक्षा राठी यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.
हापकिडो बॉक्सिंग राष्ट्रीय महासंघाच्या उपाध्यक्षपदी संदोष कुमार आणि के. वलवन (पाँडिचेरी) यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी संतोष बसवंते (महाराष्ट्र) यांची निवड झाली. कार्यकारी सदस्य म्हणून सी. सी. रवींद्रन (केरळ), आझाद सिंग (उत्तर प्रदेश), एकादशी बेहरा (ओडिशा), नंदेश एस. (कर्नाटक), गुरूनाथ नाईक (गोवा) यांची निवड करण्यात आली आहे.
आतापर्यंत २३ राज्यात असलेला हापकिडो बॉक्सिंग हा खेळ संपूर्ण भारतात पोचावा यासाठी हापकिडो बॉक्सिंग राष्ट्रीय महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीस सहकार्य करणाऱ्या विविध आयोगाचीही यावेळी स्थापना करण्यात आली व जबाबदारी निश्चित करण्यात आली. राष्ट्रीय विकास आयोग अध्यक्षपदी सागरमल गुप्ता (मध्य प्रदेश) यांची निवड करण्यात आली असून प्रशांत पवार (महाराष्ट्र) यांची सचिव म्हणून तर राजा मणीकंदन (तामिळनाडू) यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षपदी उषा नार्वेकर (गोवा) तर सचिव म्हणून मिथुरी राजेश (तामिळनाडू) यांची निवड झाली. राष्ट्रीय प्रशिक्षक आयोग अध्यक्ष म्हणून ए. ज्योती (पाँडिचेरी) यांची निवड झाली. सचिवपदी प्रकाश जयगडी(गोवा) तर सदस्य म्हणून धनंजय बनसोडे (महाराष्ट्र ) यांची निवड झाली.
राष्ट्रीय जाहिरात आयोग अध्यक्ष म्हणून गुरूनाथ पै (गोवा) यांची निवड झाली तर सचिवपदी राजकुमार यादव (मध्य प्रदेश) तर सदस्य म्हणून प्रशांत गायकवाड (महाराष्ट्र) यांची निवड झाली. राष्ट्रीय रेफरी आयोग अध्यक्षपदी जी. बालचंद्रन (पाँडिचेरी) यांची निवड झाली. सचिवपदी मुथू कुमारन(तामिळनाडू) यांची तर सदस्य म्हणून शब्बीर पठाण (महाराष्ट्र ) यांची निवड झाली.
राष्ट्रीय अॕथलीट आयोग अध्यक्षपदी मौसी सामी (पाँडिचेरी), सचिवपदी आझाद सिंग (उत्तर प्रदेश) यांची तर सदस्य म्हणून एकादशी बेहरा (ओडिशा) यांना निवडण्यात आले.
२०२२ या वर्षाची राष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग चॕम्पियनशीप १७ व १८ डिसेंबरला मध्य प्रदेशमध्ये घ्यायचे निश्चित करण्यात आले. संपूर्ण देशातील राज्यस्तरीय सचिवांना याआधी पाच लाख रुपये वार्षिक विमा लागू असतो. या वर्षापासून त्यात दुप्पट वाढ करून तो दहा लाख करण्यात आला. हापकिडो बॉक्सिंग राष्ट्रीय महासंघाच्या दशकपूर्ती निमित्त ‘दी बूक आॕफ हापकिडो बॉक्सिंग’ या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.