विद्यापीठातील लघुसंशोधन प्रकल्पांच्या ‘बटवड्या’ला अखेर स्थगिती, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत खडाजंगीनंतर कुलगुरूंचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत लघुसंशोधन प्रकल्प मंजुरीतील भेदभावावरून जोरदार खडाजंगी झाली. रसायनशास्त्र विषयातील प्राध्यापकांवरच अतिप्रेम आणि इतर विषयांतील प्राध्यापकांशी भेदभाव का?असा सवाल करत व्यवस्थापन परिषद सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी या लघुसंशोधन प्रकल्पाच्या बटवड्याला अखेर स्थगिती दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ येत्या २२ फेब्रुवारी रोजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, परंतु ही बैठक वादळी ठरली ती लघुसंशोधन प्रकल्प वाटपातील भेदभावावरून!
हेही वाचाः विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची आजची बैठक डॉ. भास्कर साठेंच...