महाराष्ट्र

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग; पुढील पाच दिवस मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचे संकट
महाराष्ट्र

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग; पुढील पाच दिवस मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचे संकट

मुंबईः  एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत चालला असतानाच दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये उष्णतेत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील पाच दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळ वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या दरम्यान ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. आज सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. उद्या (२९ मार्च) रोजी सिंधुदुर्ग, कोल्ह...
मंत्रालयात आता फक्त ऑनलाईन ॲपद्वारेच मिळणार प्रवेश, नव्या प्रणालीने कसा मिळवायचा प्रवेश? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
महाराष्ट्र

मंत्रालयात आता फक्त ऑनलाईन ॲपद्वारेच मिळणार प्रवेश, नव्या प्रणालीने कसा मिळवायचा प्रवेश? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मुंबई: मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळखआधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली. टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे.  त्यामुळे यापुढे मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना कोणत्याही कामाकरिता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. अभ्यांगतांना मंत्रालयाच्या ज्या विभागात कामानिमित्त प्रवेश आवश्यक आहे. केवळ त्यांना दिलेल्या वेळेत आणि अनुज्ञेय असलेल्या मजल्यावरच प्रवेश करावा लागणार आहे. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास अभ्यागतावर कारवाई केली जाणार आहे. अभ्यागतांना संबंधित विभागातील आपले काम पूर्ण झाल्यावर विहीत वेळेत मंत्रालयातून बाहेर पडावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरीक व दिव्यां...
एमपीएससी परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार
महाराष्ट्र

एमपीएससी परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप लागू करण्याचा निर्णय कायम राहणार आहे. २०२२ मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता, परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर २०२५ पासून तो लागू करण्याचे ठरवण्यात आले. आता तो मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत सांगितले. आ. प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनीही प्रश्नाला उत्तर दिले. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आ. शशिकांत शिदे, सदाभाऊ खोत, एकनाथ खडसे, प्रसाद लाड यांनीही चर्चेमध्ये सहभाग घेतला. एमपीएससी परीक्षा यूपीएससीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेतली जाणार आहे. काही कोचिंग क्लासेसच्या लोकांनी विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी मुलांच्या भव...
ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले विद्रोही साहित्य संमेलनात म्हणाले होते: इच्छा असूनही मी ‘मोदी इज ऍशहोल’ म्हणू शकत नाही, महिनाभरानंतर गुन्हा दाखल
महाराष्ट्र, राजकारण

ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले विद्रोही साहित्य संमेलनात म्हणाले होते: इच्छा असूनही मी ‘मोदी इज ऍशहोल’ म्हणू शकत नाही, महिनाभरानंतर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. टकले यांनी आपल्या भाषणात सामाजिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये केल्याच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नूतन कॉलनीतील रहिवासी आप्पासाहेब बाबासाहेब पारधे यांनी निरंजन टकले यांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून निरंजन टकले यांच्या विरोधात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम ३५६ (२) आणि ३५३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील आमखास मैदानावर  २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान १९...
‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खानविरूद्ध बेगमपुरा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल, पीएचडीचे प्रवेशही रद्द करणार
महाराष्ट्र, विशेष

‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खानविरूद्ध बेगमपुरा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल, पीएचडीचे प्रवेशही रद्द करणार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): अनेक कारनाम्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा इद्रिस खान आणि सहसचिव पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान यांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या बोगस एम.फिल. पदवीच्या आधारे पेटमधून सूट मिळवून पीएच.डी.ला मिळवल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला असून आता या दोघांचेही पीेएच.डी. चे प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांनी दिली. २२ मार्च रोजी न्यूजटाऊनने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान या दोघांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून अनुक्रमे इंग्रजी आणि हिंदी विषयातील बन...
डीपीयूच्या बोगस एमफिलवरच ‘पेट’ला कट मारून आस्मा व मकसूद खानने मिळवला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठात पीएचडीला प्रवेश!
महाराष्ट्र, विशेष

डीपीयूच्या बोगस एमफिलवरच ‘पेट’ला कट मारून आस्मा व मकसूद खानने मिळवला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठात पीएचडीला प्रवेश!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान यांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (डीपीयू) नाव व लोगो वापरून एम. फिल.ची बोगस पदवी तयार केल्याचा गौप्यस्फोट न्यूजटाऊनने केल्यानंतर उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून या दोघांनी याच बोगस पदवीच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच. डी. च्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या पेटमधून सूट मिळवून पीएच.डी.ला प्रवेश घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुलताबाद येथील वादग्रस्त कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चालवणाऱ्या कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान यांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून अनुक्रमे इंग्रजी आणि हिंदी विषयातील बोगस एम.फिल.ची पदवी तयार केली. या दोघांकडे असलेल्या एम.फिल.च्या पदव्यांची सत...
मराठी पत्रकार परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी बालाजी सूर्यवंशी, सचिवपदी प्रकाश भगनुरे
महाराष्ट्र

मराठी पत्रकार परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी बालाजी सूर्यवंशी, सचिवपदी प्रकाश भगनुरे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मराठी पत्रकार परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हाध्यक्षपदी बालाजी सूर्यवंशी तर सचिवपदी प्रकाश भगनुरे यांची निवड करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे बैठक झाली. या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, डिजिटल मीडियाचे अनिल वाघमारे, सचिव सुरेश नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत मराठी पत्रकार परिषदेची छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी बालाजी सूर्यवंशी व सचिवपदी प्रकाश भगनुरे यांची करण्यात आल्याचे परिषदेचे वविश्वस्त एस. एम. देशमुख यांनी जाहीर केले.   उर्वरित जिल्हा कार्यकारिणी अशीः कार्याध्यक्ष- कानिफ अन्नपूर्णे, मुख्य समन्वयक- स. सो. ...
आणखी एक ‘चारसौ बीसी’: ‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान यांची डॉ. डीवाय पाटील विद्यापीठाची एमफिलची पदवीही बोगस!
देश, महाराष्ट्र, विशेष

आणखी एक ‘चारसौ बीसी’: ‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान यांची डॉ. डीवाय पाटील विद्यापीठाची एमफिलची पदवीही बोगस!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कोहिनूर शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आणखी एक ‘चारसौ बीसी’  न्यूजटाऊनच्या हाती आली आहे. या संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान यांनी पुण्यातील प्रतिष्ठित डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचीच फसवणूक करून एम.फिल. च्या बोगस पदव्या मिळवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेंगळुरूच्या राजीव गांधी हेल्थ सायन्सेस विद्यापीठाची (आरजीयूएचएस) बीएचएमएसची बनावट गुणपत्रिका व पदवी तयार केल्याप्रकरणी कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि सचिव असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. आस्मा खान यांच्याविरुद्ध बेंगळुरूच्या टिळकनगर पोलिस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल झालेला असून २५ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू पोलिसांनी डॉ. मझहर खान यांना अटकही केली होती. तर उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील वीर बहादूरसिंग पूर्वांचल विद्...
टीईटी-२०२४ परीक्षेतील राखीव निकालांवर २५ मार्चपासून सुनावणी, ७८६ उमेदवारांना म्हणणे मांडण्याची संधी!
महाराष्ट्र

टीईटी-२०२४ परीक्षेतील राखीव निकालांवर २५ मार्चपासून सुनावणी, ७८६ उमेदवारांना म्हणणे मांडण्याची संधी!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेत राखीव ठेवण्यात आलेल्या निकालांची सुनावणी २५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार असून या सुनावणीत निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या ७८६ उमेदवारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार आहे.  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेतील ७८६ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. या उमेदवारांना आपले म्हणणे मांडता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत २५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान सकाळी ११ वा. सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने उमेदवार निहाय नियोजन दिले असून त्यानुसार उमेदवारांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयात उपस्थित र...
आग्र्यात होणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे, तज्ज्ञांची समितीही स्थापणार
देश, महाराष्ट्र

आग्र्यात होणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे, तज्ज्ञांची समितीही स्थापणार

मुंबई: आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी केली होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे. स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासतज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथे...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!