केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठ ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ


मुंबई: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास ३१ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. ३१ ऑक्टोबरपर्यंत सुमारे ४५ हजार ७३१ अर्जदारांनी केळी पिकासाठी विमा योजनेत सहभाग घेतला होता.

तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी या योजनेत ठराविक वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

राज्य सरकारची विनंती मान्य करण्यात आली असून ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेतील सहभाग वाढवून आपला विमा निर्धारित वेळेत भरून घ्यावा, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!