औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकः उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत करता येणार मतदारांची नाव नोंदणी


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघाची मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत मतदार यादीत नव्याने नावाचा समावेश करता येईल किंवा मतदारांच्या नावात सुधारणा किंवा नावही वगळता येईल, असे असे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या सहायक मतदार नोंदणी अधिकारी मंजूषा मिसकर यांनी म्हटले आहे.

मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी ६ नोव्हेंबर २०२५ रोजी पर्यंत प्राप्त झालेल्या मतदारांची प्रारुप मतदार यादी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच प्रारुप यादीबाबत दावे व हरकती सादर करण्यास संधी देवून त्यावर निर्णय घेवून ३० डिसेंबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

विधानपरिषदेच्या सदर जागा डिसेंबर २०२६ मध्ये रिक्त होणार आहेत. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० मधील तरतुदीनुसार मतदार यादयामध्ये संबंधित निवडणूकांकरीता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत सुधारणा, नव्याने समावेशन किंवा वगळणी करता येते. त्यामुळे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या ३० डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतरही त्या याद्यामध्ये ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने नव्याने नाव समाविष्ट करण्याची संधी पात्र मतदारांना संबंधित निवडणूकांच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत उपलब्ध असणार आहे, असे ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या सहायक मतदार नोंदणी अधिकारी मंजूषा मिसकर यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!