राज्यातील २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नुकतेच पदोन्नत झालेल्या १२ अधिकाऱ्यांनाही मिळाली पोस्टिंग!


मुंबईः राज्यात महायुती सरकार पुनःश्च एकदा सत्तेत आल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून सुरू झालेले प्रशासकीय बदल्यांचे सत्र सुरूच असून गुरूवारी २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे नुकतेच भारतीय प्रशासन सेवेत (आयएएस) पदोन्नती मिळालेल्या १२ अधिकाऱ्यांनाही पोस्टिंग देण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात प्रशासकीय बदल्यांचे सत्र सुरू आहे. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांबरोबरच महसूल आणि पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यातच राज्य सरकारने ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. आता गुरूवारी तब्बल २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात नुकतेच पदोन्नत झालेल्या १२ आयएएस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. बदल्या झालेले आयएएस अधिकारी असेः

हेही वाचाः महाराष्ट्रातील १२ महसूल अधिकारी बनले आयएएस, यूपीएससीने दिली पदोन्नती!

  • एम.एम. सूर्यवंशी (आयएएस, एससीएसः२०१०) यांची मुंबईतील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून वसई-विवार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
  • दीपा मुधोळकर-मुंडे (आयएएस, आरआरः२०११) यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदावरून पुण्यातील समाज कल्याण आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
  • निलेश गटणे (आयएएस, एससीएसः२०१२) यांची पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरून मुंबईत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.
  • ज्ञानेश्वर खिलारी (आयएएस, एससीएसः२०१३) यांची पुणे येथील ओबीसी, बहुजन कल्याण संचालकपदावरून पुणे येथील भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त सेटलमेंट आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
  • अनिलकुमार पवार (आयएएस, एससीएसः २०१४) यांची वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून ठाणे येथील एमएमआरएसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
  • सतीशकुमार खडके (आयएएस, एससीएसः २०१४) यांची मंत्रालयातील महसूल आणि वन विभागाच्या संचालकपदावरून (आपत्ती व्यवस्थापन) पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
  • भालचंद्र चव्हाण (आयएएस, नॉन एससीएसः२०१९) यांची पुणे येथील भू-सर्वेक्षण विकास संस्थेच्या आयुक्तपदावरून मंत्रालयातील महसूल आणि वन विभागाच्या संचालकपदी (आपत्ती व्यवस्थापन) बदली करण्यात आली आहे.
  • सिद्धार्थ शुक्ला (आयएएस, आरआरः २०२३) यांच्या २ जुलै २०२५ रोजीच्या बदली आदेशात बदल करण्यात आला आहे. आधी त्यांची बदली सहायक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी आयटीडीपी, गोडपिंप्री उपविभाग, चंद्रपूर येथे बदली करण्यात आली होती. आता त्यांची बदली सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयटीडीपी, धारणी उपविभाग, अमरावती येथे बदली करण्यात आली आहे.
  • विजयसिंह शंकरराव देशमुख (अतिरिक्त जिल्हाधिकारीपदावरून आयएएसपदी बढती) यांची छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त-२ पदावरून मुंबई येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.
  • विजय सहदेवराव भाकरे (अतिरिक्त जिल्हाधिकारीपदावरून आयएएसपदी बढती) यांची भंडारा येथील जिल्हा जात वैधता समितीच्या अध्यक्षपदावरून नागपूर येथील विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे.
  • त्रिगुण शामराव कुलकर्णी (अतिरिक्त जिल्हाधिकारीपदावरून आयएएसपदी बढती) यांची पुणे येथील मेडाच्या अतिरिक्त महासंचालकपदावरून पुणे येथीलच यशदाच्या उपमहासंचालकपदावर बदली करण्यात आली आहे.
  • गजानन धोंडीराम पाटील (अतिरिक्त जिल्हाधिकारीपदावरून आयएएसपदी बढती) यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरून पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर बदली करण्यात आली आहे.
  • पंकज संतोष देवरे (अतिरिक्त जिल्हाधिकारीपदावरून आयएएसपदी बढती) यांची लातूरच्या जिल्हा जातवैधता समितीच्या अध्यक्षपदावरून पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदावर बदली करण्यात आली आहे.
  • महेश भास्करराव पाटील (अतिरिक्त जिल्हाधिकारीपदावरून आयएएसपदी बढती) यांची  पुणे विभागाच्या अतिरिक्त आयुक्त (महसूल) पदावरून पुणे येथील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
  • मंजिरी मधुसुदन मानोलकर (अतिरिक्त जिल्हाधिकारीपदावरून आयएएसपदी बढती) यांची नाशिक विभागाच्या सहआयुक्त (पुनर्वसन) पदावरून पुणे येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • आशा अफझलखान पठाण (अतिरिक्त जिल्हाधिकारीपदावरून आयएएसपदी बढती) यांची नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयातील सहसचिवपदावरून नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयातील सहसचिवपदावर बदली करण्यात आली आहे.
  • राजलक्ष्मी सफिक शाह (अतिरिक्त जिल्हाधिकारीपदावरून आयएएसपदी बढती) यांची कोकण विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त (सामान्य) पदावरून मुंबई येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.
  • सोनाली निळकंठ मुळे (अतिरिक्त जिल्हाधिकारीपदावरून आयएएसपदी बढती) यांची अमरावतीच्या जिल्हा जातवैधता समितीच्या अध्यक्षपदावरून पुणे येथे ओबीसी, बहुजन कल्याण संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
  • गजेंद्र चिंमतराव बावणे (अतिरिक्त जिल्हाधिकारीपदावरून आयएएसपदी बढती) यांची बुलढाणा येथील जिल्हा जातवैधता समितीच्या अध्यक्षपदावरून पुणे येथील भू-सर्वेक्षण संस्थेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
  • प्रतिभा समाधान इंगळे (अतिरिक्त जिल्हाधिकारीपदावरून आयएएसपदी बढती) यांची सांगली येथील जिल्हा जातवैधता समितीच्या अध्यक्षपदावरून छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्यांक विकास आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!