रेशनकार्डचे आधार प्रमाणिकरण, ई-केवायसी अनिवार्य; २८ फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी न केल्यास बंद होईल अन्नधान्य पुरवठा!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांनी (रेशनकार्डधारक) आधार प्रमाणीकरण ई-केवायसी २८ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीतच करणे अनिवार्य असून या मुदतीत रेशनकार्डचे आधार प्रमाणिकरण व ईकेवायसी न केल्यास अन्नधान्याच्या पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे.

आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्यासाठी गावोगावी शिबिरे आयोजीत केले जात आहेत. शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करावयाचे आहे. ही प्रक्रिया दि.२८ फेब्रुवारी पर्यंत करावयाची आहे.

ई-केवायसी केले नाही तर त्यानंतर धान्य वितरण  बंद होऊ शकते, याची नोंद घ्यावी. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा. सर्व लाभार्थी व रास्तभाव धान्य दुकानदार यांनी दि.२८ पर्यंत आपले ई- केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!