२६ ते २८ डिसेंबरदरम्यान राज्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना खबरदारीचा इशारा


मुंबई:  पश्चिमी प्रकोपामुळे कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात असून २६ ते २८ डिसेंबरदरम्यान राज्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

२६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भागात पावसाची शक्यता आहे. २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

२८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या आठवड्यात राज्यात गारपीट, पाऊस आणि नंतर पुन्हा थंडी असा अनुभव येऊ शकतो. २४ डिसेंबर रोजी काही प्रमाणात बोचरे वारे अनुभवायला येऊ शकतात. २५ आणि २६ डिसेंबर रोजी थंडी कमी होऊन संपूर्ण राज्यात उबदारपणा जाणवेल. गुरूवार ते शनिवार (२६ ते २८ डिसेंबर) या तीन दिवसांत ढगाळ वातावरण राहून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

या भागातील शेतकऱ्यांनी कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *