भाजपची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख आणि देवयानी फरांदेंना संधी


मुंबईः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. आतापर्यंत भाजपने १२१ उमेदवार जाहीर केले आहेत. जत विधानसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे यांना तर शिराळा मतदारसंघातून सत्यजीत देशमुखांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना किती जागा लढवणार, याबाबतचा कोणताही फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नसताना भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे.

दुसऱ्या यादीतील उमेदवार असे

  • धुळे ग्रामीणः राम भदाणे
  • मलकापूरः चैनसुख संचेती
  • अकोटः प्रकाश भारसाखळे
  • अकोला पश्चिमः विजय अग्रवाल
  • वाशिमः श्याम खोडे
  • मेळघाटः केवलराम काळे
  • गडचिरोलीः डॉ. मिलिंद नरोटे
  • राजुराः देवराव भोगले
  • ब्रह्मपुरीः कृष्णलाल सहारे
  • वरोराः करण देवतळे
  • नाशिक मध्यः देवयानी फरांदे
  • विक्रमगडः हरिश्चंद्र भोये
  • उल्हासनगरः कुमार आयलानी
  • पेणः रविंद्र पाटील
  • खडकवासलाः भिमराव तापकीर
  • पुणे कॅन्टोनमेंटः सुनिल कांबळे
  • कस्बा पेठः हेमंत रासणे
  • लातूर ग्रामीणः रमेश कराड
  • सोलापूर शहर मध्यः देवेंद्र कोठे
  • पंढरपूरः समाधान औताडे
  • शिराळाः सत्यजीत देशमुख
  • जतः गोपीचंद पडळकर
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!