मराठा आरक्षण: राजश्री उंबरे यांचे उपोषण १४ व्या दिवशी स्थगीत, केसरकरांनी दिले मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे ‘सरबत’


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच समाजाच्या विकासासाठी अन्य विविध मागण्यांसाठी  गेल्या १४ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या राजश्री उंबरे यांनी आज आपले उपोषण स्थगित केले आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपले उपोषण स्थगित करत असल्याचे घोषित केले.

केसरकर यांच्या हस्ते सरबत घेऊन त्यांनी आपले उपोषण थांबवले. १४ दिवसानंतर हे उपोषण त्यांनी स्थगित केले. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे उपोषण सुरु होते. 

उंबरे यांच्या वतीने मराठा समाजाचे शिष्टमंडळ काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेसाठी गेले होते. या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले. पालकमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह आज सायंकाळी केसरकर यांनी उपोषण स्थळी जाऊन उंबरे यांची भेट घेतली.

केसरकर यांनी उंबरे यांच्या मागण्यानिहाय प्रत्येक मुद्यावर सविस्तर चर्चा करुन उंबरे यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शंकानिरस्सन केले. त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत माहिती दिली.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माझा विश्वास आहे, त्यामुळे हे उपोषण स्थगीत करत असल्याचे राजश्री उंबरे यांनी जाहीर केले आणि केसरकरांच्या हस्ते लिंबू शरबत देऊन या उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पहा व्हिडीओ:

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *