आनंदाची बातमी: राज्यात १९ ते २२ जुलैदरम्यान सर्वदूर पावसाचा जोर वाढणार,विदर्भ-मराठवाड्यातही चांगला पाऊस!
मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा जोर वाढला असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे १९ ते २२ जुलैदरम्यान राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे बाष्पांनी भरलेले ढग पश्चिम घाट ओलांडून पुढे जातील.याच कालावधीत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. परिणामी १९ ते २२ जुलै या कालावधीत चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही चांगला पाऊस होण्याची शक्यता ...