‘डॉ.बामु’च्या कुलगुरूपदासाठी ‘या’ पाच जणांत रस्सीखेच; डॉ. सतीश पाटील, डॉ. भारती गवळी यांचा पत्ता कट!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी शोध समितीने कुलपती किंवा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे दिलेली अंतिम पाच जणांची नावे न्यूजटाऊनच्या हाती आली असून छपत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) ‘चारसौ बीस’ डॉ. सतीश पाटील आणि ‘दागी’ डॉ. भारती गवळी यांचा पत्ता कट झाला आहे. न्यूजटाऊनने या दोघांचा भंडाफोड केला होता. कुलपती १९ डिसेंबरला या पाच जणांच्या मुलाखती घेणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्र.गो. येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे.
हेही वाचाः ‘डॉ. बामु’च्या कुलगुरूपदासाठी शोध समितीने निवडले तब्बल २४ उमेदवार, २९ नोव्हेंबरला साधणार संवाद; वाचा शॉर्टलिस्टमध्ये कोणाकोणाची नावे...

