Tag: takht sachkhand gurudwara nanded

नांदेडच्या तख्त सचखंड प्रबंधन कमिटीचे सदस्य शीख समुदायातीलच राहणार, राज्य सरकारचे स्पष्टीकरण
देश

नांदेडच्या तख्त सचखंड प्रबंधन कमिटीचे सदस्य शीख समुदायातीलच राहणार, राज्य सरकारचे स्पष्टीकरण

मुंबई: नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब या गुरुद्वारामध्ये राज्य शासनाच्या नवीन निर्णयामुळे जी व्यवस्थापकीय समिती असेल त्यामध्ये सर्व सदस्य हे शीख (केशधारी) समुदायातीलच असतील असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दी तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा अधिनियम २०२४ अस्तित्वात आणण्यास मान्यता देण्यात आली. या अधिनियमाबाबात काही संस्था व व्यक्ती यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण, या अधिनियमातील तरतूदीनुसार व्यवस्थापकीय समितीमधील सर्व सदस्य हे शीख (केशधारी) समुदायातील असणार आहेत.  शीख समुदायाचे अधिकारी, तज्ज्ञ, विचारवंत आणि समाजाच्या विविध क्षेत्रात विशेष योगदान असलेल्या व्यक्तींचा या समितीमध्ये समावेश असणार आहे. शीख (केशधारी) समुदायाच्या बाहेरील कोणतीही व्यक्ती या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य असणार नाही....
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!