Tag: social work higher education

समाजकार्य महाविद्यालये आता उच्च शिक्षण विभागाकडे, नस्त्या हस्तांतरणाच्या आदेशामुळे ‘सामाजिक न्याय’च्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले!
महाराष्ट्र, विशेष

समाजकार्य महाविद्यालये आता उच्च शिक्षण विभागाकडे, नस्त्या हस्तांतरणाच्या आदेशामुळे ‘सामाजिक न्याय’च्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारितील समाजकार्य महाविद्यालये उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णयही जारी झाला आहे. या महाविद्यालयांसंबंधीच्या सर्व नस्त्या आणि कागदपत्रे उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे तत्काळ हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. बी. एस. डब्ल्यू. आणि एम.एस. डब्ल्यू. हा अभ्यासक्रम चालवणारी समाजकार्य महाविद्यालय हा विषय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सामासु कार्यासनाद्वारे हाताळण्यात येत आहे. परंतु उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत महाविद्यालयीन शैक्षणिक पद्धतीची अंमलबजावणी व शैक्षणिकविषयक कामकाज हाताळण्यात येत असल्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारितील समाजकार्य महाविद्यालये (बी. एस...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!