Tag: pimpri chinchwad zoo

पिंपरी चिंचवड प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची होणार प्रधान सचिवांमार्फत चौकशी
महाराष्ट्र

पिंपरी चिंचवड प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची होणार प्रधान सचिवांमार्फत चौकशी

नागपूर: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत जाहीर केला.  हे प्राणीसंग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहेत. आमदार श्रीमती अश्विनी जगताप यांनी  या संदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. या प्राणीसंग्रहालयाच्या नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार काम करण्यासाठी २०१७ पासून प्राणिसंग्रहालय बंद आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे काही कामे करावयाची असल्याने प्राणी संग्रहालय खुले कर...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!