Tag: old pension

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी ८ नोव्हेंबरला राज्यातील साडेसोळा लाख कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन, सरकारला दिला निर्वाणीचा इशारा
महाराष्ट्र

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी ८ नोव्हेंबरला राज्यातील साडेसोळा लाख कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन, सरकारला दिला निर्वाणीचा इशारा

मुंबईः जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. राज्यातील सुमारे साडेसोळा लाख कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या या मागणीबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला असून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ८ नोव्हेंबर रोजी राज्यातील साडेपंधरा लाख कर्मचारी आणि सुमारे एक लाख राजपत्रित अधिकारी या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होणार असून राज्यभर निदर्शने करणार आहेत. राज्य सरकारला हा निर्वाणीचा इशारा असून त्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी दिला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र नव्या पेन्शन योजनेतून मिळणारी रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे, असा आरोप कर्मचारी संघटनांकडून करण्य...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!