Tag: nonseasonal rain crop loss

अवकाळी पावसामुळे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती पिकांची नासाडी?
महाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती पिकांची नासाडी?

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्या तालुक्यातील आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ९९ हजार ३८१ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे  प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व  ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांत २६ नोव्हेंबर रोजी अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळपिकांच्या बाधित क्षेत्राबाबत आ...