Tag: Maratha Reservation OBC Sharad Pawar Devendra Fadanvis

भाजपची बांधिलकी ओबीसींशीच, शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे कट्टर विरोधक: फडणवींचा आरोप
महाराष्ट्र, राजकारण

भाजपची बांधिलकी ओबीसींशीच, शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे कट्टर विरोधक: फडणवींचा आरोप

नागपूर: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणारच आहोत. परंतु भाजपची कमिटमेंट ओबीसी समाजाशी आहे. शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे सर्वात मोठे विरोधक आहेत. त्यांनी मनात आणले असते तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण देता आले असते,असा आरोप भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांचा ‘महाविजय-२०२४’ मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना फडणवीसांनी हे आरोप केले. सध्या मराठा आरक्षणासाठी राज्यात मोठी आंदोलने चालली आहेत. परंतु मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कुणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला होता. अगदी महाविकास आघाडीचे सरकार असताना सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणाशिवाय राज्यात दुसरे प्रश्न नाहीत का? असे म्हणत हा विष...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!