वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही: सरकारचे आश्वासन
मुंबई: भांडुप कार्यक्षेत्रात अदानींच्या कंपनीला देण्यात येणारा वीज वितरण परवाना आणि सरकारी मालकीच्या वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी पुकारलेला ७२ तासांचा संप आज मागे घेण्यात आला.
राज्यातील ८६ हजार कर्मचारी,अभियंते व अधिकारी तसेच ४० हजाराच्यावर कंत्राटी कामगार मंगळवारी मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या संपावर गेले होते.
महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,अभियंते,अधिकारी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली तिन्ही वीज कंपन्यातील ३१ कामगार संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या. विविध संघटनाना संलग्न असलेल्या कंत्राटी कामगाराच्या संघटना या संपाला पाठिंबा देऊन सहभाग घेतला होता.
वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्यात येऊ नये,फेंचाईशी करण्यात येऊ नये, नवीन कामगार भरती करावी,लकंत्राटी कामगाराला कायम करण्यात यावे...