शरद पवार नुसते नमस्कार करत फिरले तरी राष्ट्रवादी काँग्रेस उभा राहील: काँग्रेस नेते थोरातांचा विश्वास
मुंबई: अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जवळपास ४० आमदारांना घेऊन भाजपला जाऊन मिळाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा सांगितला. अशा स्थितीत शरद पवारांच्या नेतृत्वातील काँग्रेस पुन्हा उभी राहील का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांच्या राजकारणाबाबत मोठा दावा केला आहे. शरद पवार राज्यात नुसते नमस्कार करत फिरले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभा राहील आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार निवडून येतील, असे थोरात म्हणाले.
शरद पवार पक्षाची पुनर्बांधणी करू शकतील असे वाटते का? असा प्रश्न 'मुंबई तक'च्या 'चावडी' कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना थोरात म्हणाले की, शरद पवार राज्यात फिरून विधानसभा आणि लोकसभेला चांगला निकाल आणतील. शरद पवार नुसते नमस्कार करत फिरले तरी रा...

