Tag: maharashtra politics Devendra Fadanvis Uddhav Thackeray BJP Shivsena

ठाकरे-फडणवीस गुप्त भेटीच्या खळबळजनक बातमीत मोठा ट्विस्ट, ‘जगातील सर्वात मोठ्या पक्षा’नेच बातमी पेरल्याच्या गोप्यस्फोटाने भाजपची गोची
महाराष्ट्र, राजकारण

ठाकरे-फडणवीस गुप्त भेटीच्या खळबळजनक बातमीत मोठा ट्विस्ट, ‘जगातील सर्वात मोठ्या पक्षा’नेच बातमी पेरल्याच्या गोप्यस्फोटाने भाजपची गोची

मुंबईः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद सुरू असतानाच शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. काँग्रेसच्या सूत्राच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली होती. मात्र आता या बातमी मागील मुख्य सूत्रधार कोण? ही बातमी कुठून आली आणि कोणी पेरली? याबाबतचा गौप्यस्फोट एका पत्रकाराने केल्यामुळे ही बातमी पेरून भाजपचीच गोची झाली आहे. काँग्रेसमधील सूत्रांचा हवाला देत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्याची भेट आणि संजय राऊत यांनी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्याची बातमी आज सकाळीच ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिली होती. महाविकास आघाडीचे जागावाटप अजून जाहीर झालेले नाही. काँग्रेस नेत...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!