Tag: maharashtra cabinet expansion portpholio distribution

अजितदादांना अर्थ, मुंडेंना कृषी, वळसे पाटलांना सहकार खाते; भाजपकडून राष्ट्रवादीच्या नव्या सवंगड्यांना वजनदार खाती!
महाराष्ट्र, राजकारण

अजितदादांना अर्थ, मुंडेंना कृषी, वळसे पाटलांना सहकार खाते; भाजपकडून राष्ट्रवादीच्या नव्या सवंगड्यांना वजनदार खाती!

मुंबई: अजित पवारांनी बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत ९ मंत्र्यांसह शपथविधी उरकून बारा दिवस उलटल्यानंतर अखेर आज शुक्रवारी खातेवाटपाचे कोडे सुटले. शिंदे गटातील मंत्री-आमदारांनी विरोध करूनही उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थ व नियोजन खाते देण्यात आले आहे. अजित पवारांबरोबर मंत्रिमंडळात सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊही जणांना सगळीच वजनदार खाती मिळाली आहेत. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे समजले जाणारे सहकार खाते दिलीप वळसे पाटलांना देण्यात आले आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खाते काढून ते मराठवाड्यातीलच धनंजय मुं...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!