Tag: IAS Transfers

आस्तिककुमार पांडे यांची पुण्यात बदली, दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगरचे नवे जिल्हाधिकारी
महाराष्ट्र

आस्तिककुमार पांडे यांची पुण्यात बदली, दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगरचे नवे जिल्हाधिकारी

मुंबई: छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या ठिकाणी दिलीप स्वामी यांना पाठवण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांची पुण्यात भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालकपदी करण्यात आली आहे. पांडे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारीपदी दिलीप स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबईतील एकात्मिक बालविकास योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची बदली मुंबईत महिला आर्थिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.  तर वसुमना पंत यांची बदली नागपुरात महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.  पुसद उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी सुहास गाडे यांची बदली  पांढरकवडा येथे एकात्मिक आदिवासी व...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!