मंत्र्यांचे जावई, भाजप आमदारांच्या कंपन्यांना शासकीय वसतिगृहे, निवासी शाळांमध्ये भोजनपुरवठ्याचे कंत्राट
मुंबईः राज्यातील शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळांमध्ये भोजनपुरवठ्याचे कंत्राट पाच राज्यस्तरीय कंत्राटदारांना देण्यात आले असून हे काम दिलेल्यांमध्ये मंत्र्यांचे जावई आणि भाजप आमदारांच्या कंपन्यांचाही समावेश आहे.
राज्यातील शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून निकृष्ट दर्जाचे जेवण, जेवणात अळ्या सापडणे आणि विद्यार्थ्यांची उपासमार होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर स्थानिक भोजनपुरवठादार हटवून पाच राज्यस्तरीय कंत्राटदारांना भोजनपुरवठ्याचे काम देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
या निर्णयानुसार ई-निविदा प्रक्रिया राबवून ४४३ शासकीय वसतिगृहे आणि ९३ निवासी शाळांमध्ये भोजनपुरवठा करण्याचे कंत्राट पाच राज्यस्तरीय कंत्राटदारांना देण्यात आले आहे.
स्थानिक भोजनपुरवठादारांकडून राज्यातील शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळांमध्ये भोजनपुरवठ्याचे काम क...