विद्यापीठात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा धुडगुस; नंग्या तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन विद्यार्थ्यांना धमकावले
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज दिवसाढवळ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धुडगुस घातला. डोक्याला भगवे उपरणे आणि हातात नंग्या तलवारी, लाठ्या-काठ्या घेतलेल्या ३० ते ४० जणांच्या टोळक्यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींना धमकावले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आज दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान बजरंग दलाच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांचे टोळके विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशदारातून विद्यापीठ परिसरात घुसले. डोक्यावर भगवे उपरणे, हातात नंग्या तलवारी आणि लाठ्या-काठ्या घेतलेले हे टोळके थेट विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत आणि ग्रंथालयादरम्यान असलेल्या नारळीबागेत शिरले.
या नारळीबागेत काही विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र बसून डबे खात होते तर काही विद्यार्थी-विद्यार्...

