चिश्तिया महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती मिळवण्यासाठी शासन प्रतिनिधीवर दबावतंत्राचा वापर?
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): खुलताबाद येथील चिश्तिया महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती मिळवण्यासाठी ज्याची मूळ नियुक्तीच बोगस आहे, अशा उमेदवाराने दबावतंत्राचा वापर सुरू केल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. शिक्षण क्षेत्रातील 'वंचित' म्हणजेच 'अंडरप्रिव्हिलेज्ड' समाजघटकासाठी काम करत असल्याचा दावा करणाऱ्या दोन शिक्षक संघटनांच्या नेत्यांना हाताशी धरून 'शासन प्रतिनिधी'ला स्वाक्षरीसाठी राजी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील उर्दू एज्युकेशन सोसायटीच्या खुलताबाद येथील चिश्तिया महाविद्यालयात नियमित प्राचार्यपदाच्या नियुक्तीसाठी ४ जुलै रोजी मुलाखती घेण्यात आल्या. या प्राचार्यपदावर नियुक्ती मिळवण्यासाठी याच महाविद्यालयात इतिहास विषयाचा प्राध्यापक असलेल्या एका उमेदवाराने जोरदार फिल्डिंग लावली होती. या उमेदवाराने सगळे 'योग' जुळवून आणले होते...