बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतच्या फेलोशिपचे नियम, निकष, विद्यार्थी संख्या बदलली; स्वाधारसाठीही नवे निकष
मुंबई: बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या फेलोशिप म्हणजेच अधिछात्रवृत्तीचे नियम, निकष व विद्यार्थी संख्येच्या मर्यादेबाबत राज्य मंत्रिमंडळाने आज महत्वाचे निर्णय घेतले.
या सर्व स्वायत्त संस्थांचे कार्यक्रम व योजनांमध्ये एकसमानता आणण्यासाठी कायमस्वरुपी समिती गठीत करण्याचा तसेच एक सर्वंकष धोरण आखण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आजच्या बैठकीत अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, स्वाधार या योजनांकरिता लाभार्थींच्या संख्येस मंजुरी देण्यात आली.
राज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्...

