अतिवृष्टीचे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शनिवारी व रविवारी प्रत्येक गावात विशेष कॅम्प


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): फार्मर आय डी अर्थात ॲग्रीस्टॅक नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मदत अनुदान त्यांच्या खात्यात जमा होण्यास अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्यात १ लाख ३१ हजार ७६५ शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी अद्याप प्रलंबित आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्यासाठी  शनिवारी (८ नोव्हेंबर) व रविवारी (९ नोव्हेंबर) प्रत्येक गावात विशेष कॅम्पचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३५५ गावांमध्ये ६ लाख ३१ हजार ७८ शेतकरी आहेत. त्यापैकी ४ लाख ९९ हजार ३१३ शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली आहे.  अद्याप १ लाख ३१ गहार ७६५ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही. तर ४८ हजार ३५५ ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीस मान्यता नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी सांगितले.

शून्य ते २ हेक्टर पर्यंतच्या ६ लाख ४४ हजार ६४९ शेतकऱ्यांना एकूण बाधीत ५१९४६४.७४ हेक्टर क्षेत्रासाठी ४८० कोटी १७ लाख ३ हजार रुपये इतके अनुदान मंजूर आहे. त्यापैकी ४ लाख ६३ हजार १४९ शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी अपलोड करण्यात आली असून त्यांची एकूण रक्कम ३४७ कोटी २० लक्ष ३४ हजार रुपये इतकी आहे.  प्रत्यक्षात आतापर्यंत २ लाख ८७ हजार ७५१ शेतकऱ्यांना २१५ कोटी ६५ लख ७३ हजार रुपये इतके अनुदान वाटप झाले आहे.

२ ते ३ हेक्टर क्षेत्र बाधीत असलेल्या ४१ हजार १३९ शेतकऱ्यांपैकी १२ हजार ७६७ शेतकऱ्यांचे अनुदान ६ कोटी ४५ लाख १२ हजार रुपये इतके अपलोड झाले आहे. तर प्रत्यक्षात ८ हजार ३०७ शेतकऱ्यांना ४ कोटी ३३ लक्ष ३ हजार रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अद्याप १ लाख ३१ हजार ७६५ शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी नाही त्यामुळे त्यांचे अनुदानाबाबत प्रक्रिया होत नाही. तरी अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांचे अनुदान वितरीत करण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी  असणे आवश्यक आहे.

ज्या शेतकऱ्यांची अद्याप ॲग्रीस्टॅक नोंदणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्यासाठी प्रत्येक गावात शनिवारी व रविवारी सर्व गावात विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्ह्यात सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना आज निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्या त्या गावात आपले सरकार सेवा केंद्रही सुरु ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!