
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मराठी पत्रकार परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हाध्यक्षपदी बालाजी सूर्यवंशी तर सचिवपदी प्रकाश भगनुरे यांची निवड करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे बैठक झाली. या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, डिजिटल मीडियाचे अनिल वाघमारे, सचिव सुरेश नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत मराठी पत्रकार परिषदेची छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी बालाजी सूर्यवंशी व सचिवपदी प्रकाश भगनुरे यांची करण्यात आल्याचे परिषदेचे वविश्वस्त एस. एम. देशमुख यांनी जाहीर केले.
उर्वरित जिल्हा कार्यकारिणी अशीः कार्याध्यक्ष- कानिफ अन्नपूर्णे, मुख्य समन्वयक- स. सो. खंडाळकर, उपाध्यक्ष-विजय हिवराळे, कोषाध्यक्ष- महादेव जामनिक, विधी सल्लागार-अॅड. नामदेव सावंत, सल्लागार-डॉ. अनिल फळे, डॉ. अब्दुल कदीर, संजय वरकड, बाबा गाडे, माणिक साळवे. उर्वरित कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल, असे या बैठकीत सांगण्यात आले.
मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे अधिवेशन शेगावमध्ये
मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे अधिवेशन संत गजाजन महाराजांच्या शेगाव नगरीत ऑगस्ट महिन्यात होणार आहे. हे अधिवेशन आयोजित करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीने पुढाकार घेतला आहे. या अधिवेशनाला राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केले आहे.
