मराठा आरक्षणासाठीची न्या. शिंदे समिती विदर्भ, कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, असा असेल दौरा कार्यक्रम


मुंबई मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे.

या समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने राज्यातील महसुली विभाग व सर्व जिल्ह्यांमध्ये दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समितीचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

अमरावती विभाग (अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलडाणा) – बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वा. विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे बैठक होणार आहे.

नागपूर विभाग (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली)- गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे बैठक होणार आहे.

कोल्हापूर व सांगली– मंगळवार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठक होणार आहे.

पुणे विभाग ( पुणे, सातारा व सोलापूर)- बुधवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे बैठक होणार आहे.

नाशिक विभाग (नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार) – शनिवार, २ डिसेंबर रोजी दुपारी १२ वा. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे बैठक होणार आहे.

सिंधुदुर्ग व रत्नागिरी– सोमवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे बैठक होणार आहे.

कोकण विभाग ( मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड)- गुरुवार, १४ डिसेंबर सकाळी ११ वा. विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे बैठक होणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!