विधानसभा निवडणूक २०२४: वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवार यादी जाहीर, जाहीर केलेले सर्व १० उमेदवार मुस्लिम!


मुंबईः महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यांमधील जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही सुरूच असताना प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने मात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात ‘आघाडी’ घेतली असून आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन १० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वंचितने आज जाहीर केलेले सर्व १० उमेदवार मुस्लिम आहेत.

वंचित बहुजन आघाडीने आज जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये औरंगाबाद मध्य,  परभणी, मलकापूर, बाळापूर, कल्याण पश्चिम आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून मोहम्मद जावेद मोहम्मद इसहाक यांना तर परभणी मतदारसंघातून सय्यद सामी सय्यद साहेबजान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हडपसरमधून ऍड. मोहम्मद अफरोज मुल्ला यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. वंचितने याआधी ११ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आज जाहीर केलेल्या १० उमेदवारांमुळे जाहीर करण्यात आलेल्या एकूण उमेदवारांची संख्या २१ झाली आहे.

वंचितची दुसरी उमेदवार यादी अशी

  • मलकापूर:  शहेजाद खान सलीम खान
  • बाळापूरः खतीब सय्यद नातीकुद्दीन
  • परभणीः सय्यद समी सय्यद साहेबजान
  • औरंगाबाद मध्यः मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक
  • गंगापूरः सय्यद गुलाम नबी सय्यद गफूर
  • कल्याण पश्चिमः अय्याज गुलजार मोलवी
  • हडपसरः ऍड. मोहम्मद अफरोज मुल्ला
  • माणः इम्तियाज जाफर नदाफ
  • शिरोळः आरिफ मोहम्मद अली पटेल
  • सांगलीः अल्लाउद्दीन हयातचंद काझी

वंचित बहुजन आघाडीने आज उमेदवार जाहीर केलेल्या मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात शिवसेनेचे, तीन मतदारसंघात भाजपचे प्रत्येकी एका मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. तर शिरोळ मतदारसंघात अपक्ष आमदार आहेत. औरंगाबाद मध्यमध्ये शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, गंगापूरमध्ये भाजपचे प्रशांत बंब तर परभणीत शिवसेनेचे राहुल पाटील हे विद्यमान आमदार आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!