बारावीच्या निकालामुळे निराश झालात? काळजी करू नका, बोर्डाने सुरू केली मोफत समुपदेशन सेवा; जाणून घ्या तपशील


पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. 

या समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत- ७३८७४००९७०, ९०१११८४२४२, ८४२११५०५२८, ८२६३८७६८९६, ८३६९०२१९४४, ८८२८४२६७२२, ९८८१४१८२३६, ९३५९९७८३१५, ७३८७६४७९०२ आणि ९०११३०२९९७

भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील, याची विद्यार्थी, पालक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!