छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): दौलताबाद किल्ला ते वेरुळ लेणीदरम्यान रविवारी (२६ नोव्हेंबर) औरंगाबाद ब्लॅक बक्स समूहातर्फे मॅरेथॉन रन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या मॅरेथॉन स्पर्धेच्या कालावधीत (पहाटे साडेचार ते सकाळी साडेअकरा) छत्रपती संभाजीनगर आयुक्तालय हद्दीतील दौलताबाद टी पॉईंट ते वेरुळ लेणी मार्गावरील वाहतूक बंद ठेवून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, तसे आदेश पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी जारी केले आहेत.
आदेशात म्हटल्यानुसार, मॅरेथॉन स्पर्धा ही दौलताबाद ते वेरुळ लेणी या रोडवर असून रविवारी (२६ नोव्हेंबर) पहाटे साडेचार ते सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर ते वेरुळ मार्गावरील वेरुळ लेणी ते कागजीपुरा पोलिस आयुक्तालयातील हद्दीपर्यंतचा रस्ता सर्व प्रकाराच्या वाहनांसाठी बंद राहील. या कालावधीत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तो या प्रमाणे-
- छत्रपती संभाजीनगर-दौलताबादमार्गे वेरुळ लेणी जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर-दौलताबाद टी पाँईन्ट (शरणापूर) कसाबखेडा-वेरुळमार्गे जातील.
- वेरुळ-खुलताबाद-दौलताबादमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहतूक वेरुळ-कसाबखेडा-माळीवाडा-दौलताबाद टी पाँईन्टमार्गे-छत्रपती संभाजीनगरकडे येईल.
- फुलंब्री-खुलताबाद-वेरुळ जाणारी वाहतूक फुलंब्री-छत्रपती संभाजीनगर-नगरनाका-दौलताबाद टी पाँईन्ट-कसाबखेडामार्गे वेरुळला जाईल.
- वेरुळ-खुलताबाद-फुलंब्री जाणारी वाहतूक वेरुळ-कसाबखेडा-दौलताबाद टी पाँईन्ट छत्रपती संभाजीनगरमार्गे फुलंब्रीकडे जाईल.
- छत्रपती संभाजीनगर-दौलताबाद-खुलताबाद जाणारी वाहतूक छत्रपती संभाजीनगर-फुलंब्रीमार्गे खुलताबाद जाईल.
- खुलताबाद-दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगर जाणारी वाहतूक खुलताबाद- फुलंब्रीमार्गे छत्रपती संभाजीनगरला जाईल.