‘आर्टी’मध्ये ८५ टक्के सवलतीत विक्रीसाठी पुस्तके उपलब्ध, ११ हजार ५२६ रुपयांची पुस्तके मिळणार १ हजार ७३० रुपयात!


मुंबई: महागडी पुस्तके जर आपणाला शंभर- दीडशे रुपयात मिळाली तर आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. नव्याने स्थापन झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असणाऱ्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेने महापुरुषांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतला असून, ८५ टक्के सवलतीत ही पुस्तके आर्टीच्या कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली.

देशातील अनेक महापुरुषांनी पुस्तकांच्या माध्यमातून आपले विचार समाजापर्यंत पोचविण्याच काम केले. त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत घेऊन जाण्यासाठी बार्टीचे महासंचालक वारे आणि निबंधक इंदिरा आस्वार यांच्या संकल्पनेतून आर्टी  संस्थेने महापुरुषांच्या पुस्तकांवर ८५ टक्के सवलत देण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.

भारताचे संविधान, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, अण्णा भाऊ साठे यांचे खंड आणि त्यांच्यावर लिहिलेली मराठी, इंग्रजी भाषेतील पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. सामाजिक, राजकीय, खासगी, शासकीय आणि शैक्षणिक संस्था तसेच प्रत्येकांनी संग्रहित ठेवावे, असे हे ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहेत.

पुस्तकाची मूळ किंमत व कंसात सवलतीचे दर

भारताचे संविधान ४५० रुपये (६३ रू.), शूद्र पूर्वी कोण होते? ३०० रुपये (४५ रू.),  बुद्ध आणि त्यांचा धम्म ४०० रुपये (६० रू.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-चांगदेव खैरमोडे सेट ४००० रुपये (६०० रू.), समग्र आंबेडकर चरित्र-बी. सी. कांबळे सेट २५०० रुपये (३७५ रू.), फकिरा १६० रुपये (२४ रू.), फकिरा-इंग्रजी अनुवाद २५०० रुपये (३७५ रू.), अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान ४८० रुपये (७२ रू.), राजर्षी शाहू रयतेच्या राज्याचे चित्रमय चरित्र १५०० रुपये (२२५ रू.), साहित्यसम्राट १५० रुपये (२३ रू.), स्वराज्य ते स्वातंत्र्य आणि समता १२० रुपये (१८ रुपये), कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व ११०० रुपये (१६५ रू.). एकूण किंमत ११ हजार ५२६ रुपये किंमतीची पुस्तके सवलतीच्या दरात १७३० रुपयात उपलब्ध होणार आहेत.

  नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यात ८० हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली असल्याची माहिती वारे यांनी दिली. आर्टी कार्यालयाचा पत्ता  बी- 201/ 202, 2 रा मजला,  ‘बी’ विंग, अर्जून सेंटर, स्टेशन रोड, गोवंडी (ईस्ट) येथे पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गोवंडी स्टेशनपासून पूर्वेकडे 5 मिनीटाच्या अंतरावर आर्टी ही संस्था आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!