देवेंद्र फडणवीस रोमँटिक नाहीत, त्यांना रोमान्स तेवढा जमत नाही आणि कळतही नाहीः अमृता फडणवीसांनी सांगितली ‘मन की बात’!


मुंबईः  देवेंद्र फडणवीस हे अजिबात रोमँटिक नाहीत… त्यांना रोमान्स तेवढा जमत नाही… ते समोर असले तरी त्यांच्यासोबत वेळ घालवता येत नाही…मस्ती करता येत नाही. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हण आठवली की माझ्या डोळ्यासमोर देवेंद्रजी झळकतात, अशी ‘मन की बात’ त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितली.

सन मराठीवरील ‘होऊ दे चर्चा, कार्यक्रम आहे घरचा’ या शोसाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या ‘मन की बात’ सांगितली. अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्यामुळे कायम चर्चेत असतात. आता त्या देवेंद्र फडणवीसांबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

धरण उशाला आणि कोरड घशाला असे म्हटले जाते तेव्हा देवेंद्र फडणवीस माझ्या नजरेसमोर झळकतात… येतात-जातात, येतात-जातात… दिसतात रोज,,, पण असं पकडन त्यांच्यासोबत वेळ घालवायचा… मस्ती करायची… असे काही करताच येत नाही…असे सांगत अमृता फडणवीस यांनी धरण उशाला असतं, कोरड घशाला असते, अशी म्हण सांगितली.

त्यावर ‘देवेंद्र फडणवीस रोमँटिक आहेत का?’ असा प्रश्न सोनाली कुलकर्णी हिने अमृता फडणवीसांना विचारला. त्यावर अमृता फडणवीस चकटन उत्तरल्या ‘नाही. देवेंद्रजी रोमँटिक नाहीत.’ त्यावर ‘आधी होते का?’ असा प्रतिप्रश्न सोनाली कुलकर्णीने विचारला. त्यावर ‘देवेंद्र फडणवीस कधीच रोमँटिक नव्हते,’ असे उत्तर अमृता फडणवीस यांनी दिले.

 अमृता फडणवीसांच्या या उत्तरावर ‘लग्नाच्या आधी पण नाही, नंतर पण नाही?’ असे सोनाली कुलकर्णीने पुन्हा खोदून विचारले. त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘लग्नाच्या आधीही नाही आणि नंतरही नाही. देवेंद्रजी प्रॅक्टिकल आहेत. मी रोमँटिक आहे. त्यांना रोमान्स तेवढा जमत नाही आणि कळतही नाही. त्यांना आता राजकारण सोडून काही कळत नाही.’

३५ पुरणपोळ्या, पातेलंभर तूप आणि फडणवीस

यापूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘किचन कल्लाकार’ या शोमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे पुरणपोळी प्रेम जाहीरपणे सांगून त्यांची चांगलीच अडचण केली होती. ‘देवेंद्र जी ३० ते ३५ पुरणपोळ्या आणि पातेलंभर तूप एका बैठकीत अगदी सहज खायचे,’ असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले होते. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस चांगलेच बेजार झाले होते. प्रत्येक कार्यक्रमात त्यांना पुरणपोळीच वाढली जात असे. आता अमृता फडणवीस यांनी केलेल्या नव्या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!