मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी, तृतीयपंथीयासह सात ते आठ जणांवर गुन्हा


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): पीपल्स एज्युकेश सोसायटीच्या नागसेवन परिसरातील मिलिंद कला महाविद्यालयाच्या महिला प्राचार्यांना एका तृतीयपंथीयासह सात ते आठ जणांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या दालनात बसलेल्या असताना कुणाल सुनील दांडगे आणि एका तृतीयपंथीय इसमासह सात ते आठ जणांनी आपल्या दालनात येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि शासकीय कामात अडथळा आणला, अशी फिर्याद मिलिंद कला महाविद्यालयाच्या महिला प्राचार्यांनी छावणी पोलिसांत दिली आहे.

महिला प्राचार्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कुणाल दांडगे यांच्यासोबत एक तृतीयपंथीय इसम प्राचार्यांच्या दालनात आला. त्याला काही मुलांनी घेऊन जाऊन मारहाण केली, अशी तक्रार त्याने प्राचार्यांकडे केली. ज्या मुलांनी मारहाण केली, त्यांच्या विरोधात तुम्ही पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद द्या, असे मिलिंद कला महाविद्यालयाच्या महिला प्राचार्या त्यांना समजावून सांगत होत्या.

त्यावर फिर्यादीत नमूद केलेल्या आरोपींनी महिला प्राचार्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तुम्ही कॉलेजच्या प्राचार्या आहे तर काय XXX उपटायला, XXX घालायला प्राचार्य झाली का? तुझ्या XXX दम नाही तर मग इथे कशाला बसली, राजीनामा देऊन टाक असे म्हणतत शासकीय कामात अडथळा निर्माण करून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद मिलिंद कला महाविद्यालयाच्या महिला प्राचार्यांनी छावणी पोलिसात दिली आहे.

प्राचार्यांनी शुक्रवारी रात्री ८ वाजता दिलेल्या फिर्यादीवरून छावणी पोलिसांनी कुणाल दांडगे, एक तृतीयपंथीय इसमासह अन्य सात ते आठ जणांविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, १४३, १४७,१४९,५०४, ५०६, ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  हे सर्व आरोपी हे टाऊनहॉल परिसरातील रहिवाशी आहेत, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक नरळे हे या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

2 Comments

  • Advocate Gautam Patekar

    बरोबर केले त्यांनी प्राचार्या काही कामाच्या नाहीत. विद्यार्थी हिताचे कुठलेही काम होत नाही. बर झाल फक्त शिव्या दिल्या मारले नाही. प्राचार्या पदाची गरिमा राखली पाहिजे.मिलिंद कला महाविद्यालयाला नवीन प्राचार्य पाहिजे. ¹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!