लोकसभेसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर, वाचा कोणाला उमेदवारी आणि कोणाचा पत्ता कट?


नवी दिल्लीः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी उमेदवार यादी आज जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांसह देशभरातील ७२ उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र निश्चित होण्याआधीच भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

भाजपच्या या यादीत नागपूरमधून नितीन गडकरी, जालन्यातून रावसाहेब दानवे, बीडमधून पंकजा मुंडे, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर भिवंडीतून कपील पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मोठा राजकीय वनवास भोगलेल्या पंकजा मुंडेंना भाजपने बीडमधून उमेदवारी दिली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या यादीत दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. ही यादी जाहीर करताना भाजपने अनेक बड्या चेहऱ्यांचा तिकिटे कापली आहे. बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकिट कापून त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना तिकिट देण्यात आले आहे.

उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचेही तिकिट कापून पियूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर-पूर्व मुंबईचे खासदार मनोज कोटक यांचे तिकिट कापून त्यांच्या ठिकाणी मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचेही तिकिट कापण्यात आले आहे. त्याऐवजी अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील २० उमेदवार असे

  • रावेर- रक्षा खडसे
  • अकोला- अनुप धोत्रे
  • नंदूरबार- हिना गावीत
  • धुळे- सुभाष भामरे
  • जळगाव- स्मिता वाघ
  • वर्धा- रामदास तडस
  • नागपूर- नितीन गडकरी
  • चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
  • नांदेड- प्रताप पाटील चिखलीकर
  • जालना- रावसाहेब दानवे
  • दिंडोरी- भारती पवार
  • भिवंडी- कपिल पाटील
  • उत्तर मुंबई- पियूष गोयल
  • उत्तर-पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा
  • पुणे- मुरलीधर मोहोळ
  • अहमदनगर- सुजय विखे पाटील
  • बीड- पंकजा मुंडे
  • लातूर- सुधाकर श्रृंगारे
  • सांगली- संजयकाका पाटील
  • माढा- रणजितसिंह निंबाळकर
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!