यवतमाळ नगरपरिषदेतील घनकचरा निविदा प्रकरणी पंधरा दिवसांत होणार दोषींवर कारवाई


नागपूर: यवतमाळ नगरपरिषदेत घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रकरणाबाबत विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालावर पंधरा दिवसांत कारवाई करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

यवतमाळ नगरपरिषदेत घनकचरा व्यवस्थापनासाठी गैरपद्धतीने डी. एम. एंटरप्राइजेस कंपनीस पात्र ठरवल्याबाबत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

यवतमाळ नगरपरिषदेतील घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रकरणाचा विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार जे दोषी आढळले असतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. विभागीय आयुक्त यांच्या चौकशी अहवालानुसार १५ दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!