‘डॉ. बामु’च्या कुलगुरूपदासाठी शोध समितीने निवडले तब्बल २४ उमेदवार; वाचा यादीत कोणाकोणाची नावे, कोणाचा पत्ता कट?


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सध्या सुरू असून कुलगुरूपदासाठी आलेल्या एकूण अर्जांपैकी शोध समितीने तब्बल २४ उमेदवार निवडले आहेत. त्यात पाच अमराठी उमेदवारांचा समावेश आहे. निवडलेल्या या उमेदवारांशी शोध समिती येत्या २९ नोव्हेंबर रोजी संवाद साधणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. डॉ. येवले यांनी १६ जुलै २०१९ रोजी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांची मुदत पूर्ण होत असल्यामुळे नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

वाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्टः कुलगुरू शोध समितीच्या ‘चारित्र्या’वरच प्रश्नचिन्ह; निवडलेल्या यादीत डॉ. सतीश पाटलांसारखे ‘चारसौ बीस’ आणि डॉ. भारती गवळींसारखे ‘दागी’ उमेदवार!

कुलगुरू शोध समितीने या पदासाठी पात्र उमेदवारांकडून २० सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर या काळात ऑनलाइन अर्ज मागवले होते. त्यात तब्बल ७८ जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्या या उमेदवारांमधून शोध समितीने २४ उमेदवार शॉर्टलिस्ट केले आहेत. या शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांशी शोध समिती २९ नोव्हेंबर रोजी संवाद साधणार आहे.

शॉर्टलिस्ट झालेले उमेदवार असे

१. प्रा. डॉ. हरेंद्र सिंग

२. प्रा. विलास शेषराव खरात

३. प्रा. सतीश जगन्नाथ शर्मा

४. प्रा. राजीव गुप्ता

५.  प्रा. सुभाष बाबुराव कोंडावार

६.  प्रोफेसर डॉ. एस.के.सिंग

७. डॉ. गणेशचंद्र नरहरराव शिंदे

८. प्रा. विजय जनार्दन फुलारी

९. प्रा. संजय श्यामराव चव्हाण

१०. प्रा. राजेंद्र बळीराम काकडे

११. प्रा. भारती वामनराव गवळी

१२. प्रा. इंद्रप्रसाद त्रिपाठी

१३. प्रा. डॉ. अनिल विश्वनाथ चांदेवार

१४. प्रा. ज्योती प्रफुल्ल जाधव

१५. डॉ. दत्तात्रय कृष्णा गायकवाड

१६. प्रा. मनोहर गणपत चास्कर

१७. प्रा. राजेंद्र गिरजप्पा सोनकवडे

१८. प्रा. उदय श्रीरामराव अण्णापुरे

१९. प्रा. अशोक महादू महाजन

२०. प्रा. संदेश रोहिदास जडकर

२१. प्रा. राजू निवृत्ती गच्चे

२२. प्रा. डॉ. संजय दागा ढोले

२३. डॉ. सतीश सुधाकरराव पाटील

२४. प्रा. प्रमोद पांडुरंग माहुलीकर

विदयापीठातील आठपैकी सहा जणांचा पत्ता कट

कुलगुरूपदासाठी अर्ज करण्यासाठी विद्यापीठातील आठ प्राध्यापकांनी प्रशासनाकडून परवानगी घेतली होती. त्यात अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, वनस्पतीशास्त्राचे प्रा. डॉ. अरविंद धाबे, परीक्षा मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी, रसायनशास्त्राचे प्रा. डॉ. सुरेश गायकवाड, पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रा. सतीश पाटील, डॉ. एम.बी. मुळे, जीवरसायनशास्त्राच्या प्रा. डॉ. वंदना हिवराळे, प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. मार्टीन रेमंड यांचा समावेश होता.

शोध समितीने शॉर्टलिस्ट केलेल्या यादीत यापैकी फक्त डॉ. भारती गवळी आणि डॉ. सतीश पाटील या दोघांचीच नावे आहेत. उर्वरित सहा प्राध्यापकांचे पत्ते शोध समितीने प्रारंभीच्या टप्प्यातच कापले आहेत.

यांचेही पत्ते कट

कुलगुरूपदासाठी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील काही उमेदवारही इच्छूक होते. विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू आणि देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, खुलताबादच्या कोहीनूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे, देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार यांनी अर्ज केले होते.

याशिवाय उमरग्याच्या छत्रपती महाविद्यालयाचे प्रा. धनंजय माने यांनीही कुलगुरूपदासाठी अर्ज केले होते. परंतु शोध समितीने प्रारंभीच्याच टप्प्यात या सर्वांना बाद करून त्यांचे पत्ते कट करून टाकले आहेत.

संवादानंतर फायनल होणार पाच जणांची नावे

कुलगुरू शोध समिती शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांशी येत्या २९ नोव्हेंबर रोजी संवाद साधणार आहे. हा संवाद साधून झाल्यानंतर पाच जणांची नावे फायनल करून ती राज्यपालांकडे पाठवली जातील. एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्ध यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कुलगुरू शोध समितीमध्ये  भोपाळच्या माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. जी. सुरेश, श्रीनगर येथील एनआयटीचे संचालक डॉ. सुधाकर एडला हे सदस्य असून उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य सचिव आहेत. श्रीनगर एनआयटीचे प्राध्यापक डॉ. जानीबुल बशीर हे नोडल ऑफिसर म्हणून काम पहात आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *