छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभापासून गरजू विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी योजनेंतर्गत २०२२-२३ वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याची मुदत आता १४ जुलै २०२३ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी दिली.
समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी शासनास केलेली विनंती विचारात घेत विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढविण्यात आलेली आहे, सन २०२२-२३ या वर्षातील ज्या गरजू, वंचित विद्यार्थ्यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज दाखल करणे प्रलंबित आहे, अशा सर्व गरजू विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोनकवडे यांनी केले आहे.