ठाकरेंच्या शिवसेनेची १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, वाचा कोणाला मिळाली कोणत्या मतदारसंघातून संधी?


मुंबईः शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत १५ उमेदवारांचा समावेश आहे. याआधी शिवसेनेने ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे शिवबंधन बांधलेले माजी आमदार अनिल गोटे यांना धुळे शहर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्ष किती जागा लढवणार याचा तिढा अद्याप सुटलेला नसताना दोन्ही युती-आघाडीतील घटक पक्ष उमेदवार याद्या जाहीर करत आहेत. आज सकाळीच ठाकरे गटाने दुसरी यादी जाहीर केली आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगणार असून शिंदे गटाचे उदय सामंत यांच्या विरोधात ठाकरे गटाने बाळ माने यांना मैदानात उतरवले आहे. मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना वडाळ्यामधून उमेदवारी देण्यात आली आहे. श्रद्धा जाधव वडाळा पोटनिवडणुकीत पराभूत झाल्या होत्या.

बुलढाण्यातून जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जयश्री शेळके यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे. शिवडीमधून अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली असून तेथे मनसेचे बाळा नांदगावकर विरुद्ध अजय चौधरी अशी बिग फाईट होणार आहे. नितेश राणेंच्या विरोधात संदेश पारकरांना उमेदवारी देण्यात आली आहे.

१५ उमेदवारांची यादी अशी

  • शिवडीः अजय चौधरी
  • धुळे शहरः अनिल गोटे
  • चोपडाः राजू तडवी
  • जळगाव शहरः जयश्री महाजन
  • बुलढाणाः जयश्री शेळके
  •  दिग्रसः पवन जयस्वाल
  • हिंगोलीः रुपाली पाटील
  • परतूरः आसाराम बोराडे
  • देवळालीः योगेश घोलप
  • कल्याण पश्चिमः सचिन बासरे
  • कल्याण पूर्वः धनंजय बोडारे
  • वडाळाः श्रद्धा जाधव
  • भायखळाः मनोज जामसुतकर
  • श्रीगोंदाः अनुराधा नागावडे
  • कणकवलीः संदेश पारकर
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!