मुंबई महापालिकेच्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे होणार लेखापरीक्षण, पुढील अधिवेशनात श्वेतपत्रिका
नागपूर: मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे लेख परीक्षण करून त्याबाबतची श्वेतपत्रिका पुढील अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधानसभेत पुरवणी मागण्यांना उत्तर देताना दिली.
नियोजन विभागाचे अपर प्रधान सचिव, नगरविकास-१ चे प्रधान सचिव आणि संचालक (वित-लेखापरीक्षण) यांची समिती ही चौकशी करेल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार योगेश सागर यांनी मुंबई महापालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. ती मान्य करण्यात येऊन याबाबत निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.
याशिवाय, नगरविकास विभागाच्या अनुषंगाने ठाणे शहरातील घनकचरा, पाणीपुरवठा, याबाबतही तक्रारी नसल्याचे सांगून ठाणे शहराला ५८५ एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे सामंत यांनी सांगितले.
सूरज परमार गुन्हा प्रकरणी तपास सुरू असून याप्रकरणी अति...