अमेरिकेत भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ!

कॅलिफोर्नियाः अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एका फळबागेत भारतीय वंशाच्या कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  मृतांमध्ये आठ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. हे कुटुंब काही दिवसांपासून बेपत्ता होते.

आठ महिन्यांच्या आरोही धेरीसह तिची आई २७ वर्षीय जसलीन कौर आणि वडिल जसदीपसिंग यांचे उत्तर कॉलिफोर्नियातील मर्सेड काऊंटीच्या एका ट्रॅकिंग कंपनीमधून अपहरण करण्यात आले होते, अशी माहिती मर्सेड काऊंटी पोलिसांनी दिली.

 या चौघांचे मृतदेह इंडियाना आणि हुतचीन्सन रस्त्यावरील एका फळबागेत बुधवारी आढळून आले. फळबागेतील एका शेतमजुराला हे मृतदेह आढळून आले होते. या घटनेमुळे येत असलेला राग शब्दांत सांगू शकत नाही, असे शेरीफ वार्न्के या पोलिस अधिकाऱ्याने दिली. या कुटुंबाचे अपहरण करतानाचा व्हिडीओ पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओत जसदीप आणि अमनदीप हे हाताला बांधलेल्या अवस्थेत ट्रकिंग कंपनीतून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यानंतर काही वेळातच बाळासह जसलीन कौर इमारतीतून अपहरणकर्त्यांसोबत बाहेर जाताना दिसत आहे. या चौघांचे एका ट्रकमधून अपहरण करण्यात आले होते.

या कुटुंबाच्या अपहरणानंतर ४८ वर्षीय मॅन्युअल सॅलगाडो या संशयिताला पोलिसांना ताब्यात घेतले आहे. या संशयित अपहरणकर्त्याने कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या सॅलगाडोवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सॅलगाडोच्या कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधून त्याने केलेल्या  गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती दिली आहे. खून करण्यात आलेले भारतीय वंशाच्या कुटुंबाचे मूळ नातेवाईक पंजाबच्या होशियारपूरच्या तांडा ब्लॉकमधील हरसीपिंड गावचे रहिवाशी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!